लासलगावाबद्दल
ग्रामपंचायत ईमारत स्वतःची मालकीची आहे.
-
ग्रामपंचायत माहिती तपशील
.लासलगाव हे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे.
निफाड तालुक्यातील लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपली कन्या सरकार मुक्ताबाई फणसे यांना लासलगाव, मडकी जाम, निफाड, जुन्नरचा काही भाग आदंन दिला होता सरकार मुक्ताबाई फणसे यांचा लासलगावच्या मध्यभागी भुईकोट असुन त्यास 9 बुरुज तीन प्रवेश द्वार आहेत.
हे गाव कांद्यासाठी आणि वाइन द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. लासलगाव मार्केटमधील कांदे देशभरात आणि परदेशातही पाठवले जातात. येथे कांद्यावर प्रक्रिया करून ते जास्त काळ टिकवण्याचे कामही केले जाते.
लासलगावची प्रमुख वैशिष्ट्ये:
- कांद्याचे मोठे मार्केट:लासलगाव हे आशियातील सर्वात मोठे कांदा मार्केट मानले जाते, जिथे कांद्याचा मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो.
- निर्यात:
- येथील कांदे भारतातच नव्हे, तर जगातही निर्यात केले जातात.
- कांदा प्रक्रिया:कांद्याला अधिक काळ ताजे ठेवण्यासाठी भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) येथे प्रक्रिया केली जाते.
- द्राक्षे:
- लासलगाव वाइन द्राक्षांसाठी देखील प्रसिद्ध आहे.
- शिक्षण:
- गावात कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयदेखील आहे.
मुद्रा
ग्रामपंचायतीचे नांव:ग्रामपालिका लासलगांव, ता.निफाड, जि.नाशिक
स्थापना:१३/१०/१९२२
मालकी:ग्रामपंचायत ईमारत स्वतःची मालकीची आहे.
कुटुंब माहिती
एकूण कुटूंब: 3926
गरीबी रेषेखाली: 692
प्रशासकीय
एकूण मेंबर्स: 17
वार्ड: 6
ग्रामपालिका लासलगांव, ता.निफाड, जि.नाशिक
ग्रामपंचायत ईमारत स्वतःची मालकीची आहे.
गावाचा प्रकार:
बिगर आदीवासी
भौगोलिक माहिती
एकूण क्षेत्र:६२७.८८ चौ.कि.मी.
शेती उपयुक्त क्षेत्र:५४४.५६ चौ.कि.मी. (शेतकरी संख्या ३९७)
मुख्य पिके:कांदा, सोयाबीन, गहू, द्राक्षे
मुख्य नदी:शिव नदी
लोकसंख्येचा तपशिल (2011)
एकूण लोकसंख्या:१७३६०
पुरुष:८८८४
स्त्री:८४७६
महिला-पुरुष टक्केवारी:५१.१८% - ४८.८२%
प्रशासन व नेतृत्व
सरपंच:सौ.योगिता योगेश पाटील
उपसरपंच:श्री.रामनाथ मगन शेजवळ
ग्रामपंचायत सदस्य संख्या:17
वार्ड संख्या:6
जन्म / मृत्यु / साक्षरता
जन्म दर: 17.9%
एकूण साक्षरता: ७७%
अल्पसंख्यांक माहिती
| अ.क्र. | जातीचे नांव | कुटुंब संख्या | लोकसंख्या |
|---|---|---|---|
| 1 | मुस्लिम | 900 | 2484 |
| 2 | पारसी | 0 | 0 |
| 3 | शीख | 12 | 115 |
| 4 | ख्रिच्चन | 40 | 230 |
| 5 | जैन | 700 | 2800 |
| 6 | नवबौध्द | 140 | 942 |